अखनूरजवळील जनरल रिझव्र्ह इंजिनिअर फोर्सच्या छावणीवर सशस्त्र दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात तीन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
जम्मूतील अखनूर सेक्टर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांचा माग घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
रविवारी रात्री एकच्या सुमारास (जीआरइएफ)च्या छावणीजवळील बत्तल गावानजीक दोनपेक्षा अधिक शस्त्रधारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने म्हटले आहे. हे तीन नागरिक जीआरइएफ जवळ मजुरीचे काम करणा-यांपैकी होते. या हल्ल्यानंतर लष्कराच्या पथकाने ठिकठिकाणी काउंटर ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनचा भाग म्हणून जम्मूनजीक सर्व मार्गावर लष्कराकडून नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे.