पेणजवळील रामवाडी पुलावर कंटेनर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे २ ते ३ किमी रांगा लागल्या आहेत. हा अपघात सकाळी ८.३० ते ९ च्या सुमारास झाला. कंटनेर पुलावरून कोसळताना थोडक्यात बचावला. कंटनेर आडवा पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला. पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. अपघातात जीवितहानीबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.
पेणजवळ कंटेनर उलटला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
