हार्बर वाहतूक बोंबलली!

हार्बर मार्गावर लोकलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडलीय.

पहाटे सव्वा सहा वाजताच्या सुमारास गोवंडी आणि मानखुर्द स्टेशन दरम्यान रुळाला तडा गेल्यानं अप मार्गावरची वाहतूक सुमारे 25 मिनिटं पूर्णपणे ठप्प होती. मात्र, आता दुरूस्तीचं काम पूर्ण झालंय. पण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय.

दोन्ही बाजूची वाहतूक अर्धातास उशिरानं सुरू आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठी गर्दी स्टेशनवर बघायला मिळतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *