शाळकरी मुलींना अश्लील चित्रफीत दाखणाऱ्या इसमाला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माणिक दत्तू पवार (वय वर्ष ३९) असे या इसमाचे नाव आहे. माणिक पवार शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलींना बोलावून अश्लील चित्रफीत दाखवायचा. संबंधित घटना चाकणमधील खराबवाडीमध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार विद्यार्थिनी, शिक्षिका आणि महिला दक्षता समितीने समोर आणला आहे. मंगल हनुमंत देवकर यांनी या प्रकरणी चाकण पोलिसात तक्रार नोंदवली असून बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.
शाळकरी मुलींना अश्लील चित्रफित दाखवणारा इसम पोलिसांच्या ताब्यात

