ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

 बांगलादेशची राजधानी ढाकामधील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
ढाकामधील गुलशन या आलिशान कॅफेवर 1 जुलै 2016  रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वात भ्याड दहशतवादी हल्ला होता.
नेरुल इस्लाम मर्झान असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून सोबत आणखी एका संशयित दहशतवादीही मारला गेला आहे. दहशतवादी मर्झानचे वय जवळपास 30 असून तो ढाका कॅफे हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक होता, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *