पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर एसटी बसचा अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळ डाळज येथे एसटी बसला अपघात झालाय. यात १२ विद्यार्थी जखमी झालेत.

ही शाळेच्या सहलीची बस होती. सहलीवरुन परतत असताना बसला हा अपघात झालाय. या अपघातात १२ विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. इंदापूरमधील श्री. ना. ऱा. इंग्लिश मिडियमचे हे विद्यार्थी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *