मुंबई – गोवा महामार्गावरील अपघातात दोन तरुण ठार

मुंबई – गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड इथे झालेल्या अपघातात दोन  तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात  झाला.

अभिषेक कुडाळकर आणि श्रीकृष्ण डेरे अशी या दोन युवकांची नावे आहेत. हे दोघेही छोट्या टेम्पोमधून चिपळूणकडे निघाले होते. पहाटे  दोनच्या सुमारास टेम्पो महाडच्या चांभारखिंड परिसरात आला असताना पिकअप जीपने मागून त्याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे हा टेम्पो समोरुन येणा-या बसवर आदळून ही भीषण दुर्घटना घडलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *