बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

 ज्येष्ठ काँग्रेस नेते  आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीतल्या राहत्या घरी त्यांचं काल निधन झाले. विखे पाटलांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 9 ते 11 या वेळात प्रवरा कारखाना गाडगीळ सभागृह येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी 12 वाजता लोणीच्या जिल्हा परिषद शाळा मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान,  मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्रीपद भूषवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *