अकोल्यामधील एमआयडीसी परिसरातील अक्षय केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागलीये.
कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीये.