विम्बल्डन विजेत्या महिला टेनिसपटूवर चाकूहल्ला

दोनवेळा विम्बल्डन चषकावर नाव कोरणारी चेक प्रजासत्ताकची अव्वल महिला टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हावर चाकू हल्ला झाला असून, त्यात ती जखमी झाली आहे. घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात ह्ल्लेखोराने पेट्रा क्विटोव्हावर हल्ला केला.
क्विटोव्हाच्या डाव्या हातावर जखमा झाल्या असून तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. क्विटोव्हाच्या जिवीताला कोणताही धोका नाही अशी माहिती क्विटोव्हाचे प्रवक्ते कारेल तेजकाल यांनी दिली. क्विटोव्हा प्रॉसतेजोव्ह येथील घरामध्ये असताना ही घटना घडली.
क्विटोव्हाने 2011 आणि 2014 असे दोनवेळा विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने आधीच पुढच्या महिन्यात होणा-या झेक प्रजासत्ताकच्या हॉपमॅन कप स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *