नोटाबंदीनंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग तसेच पोलिसांनी सुमारे १00 कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. यातील बहुतांश रक्कम २000 रुपयांच्या नोटांतील आहे. हा पैसा ईडीच्या विशेष खात्यांत जमा करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले असून, त्याद्वारे हा पैसा पुन्हा चलनात येत आहे.
नोटाबंदीच्या काळात काळा पैसा बदलून देणाऱ्या टोळयादेशभर सक्रिय झाल्या आहेत. विविध तपासी संस्था त्यांच्या मागावर आहेत. याचा परिणाम म्हणून देशभरात सुमारे १00 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त नोटा जमा करण्यासाठी ईडीने देशातील विविध शहरांत विशेष बँक खाती उघडली आहेत. जप्त पैसा या खात्यांत जमा करण्याचे आदेश ईडी आपल्या सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. तेथून या नोटा तातडीने चलनात आणल्या जात आहेत.
