पोलिसाच्या मुलीची हत्या झाल्याचा संशय

भायखळा येथे इमारतीवरून पडलेल्या पाच वर्षांच्या मानवी इंगळेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घोडपदेव परिसरातील विघ्नहर्ता इमारतीच्या १५व्या मजल्यावर अशोक इंगळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह भाड्याने राहतात. अशोक यांचा आॅटोमोबाइलच्या सुट्या भागांचा व्यवसाय आहे, तर पत्नी आरती इंगळे या वरळी वाहतूक मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. दुपारी साडेबाराच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या मानवीला कोणी तरी १५ व्या मजल्यावरून खाली फेकून दिले. तिला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा अपघाती मृत्यू नसून तिला कोणी तरी फेकून दिल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. तसेच दोन संशयित

महिलांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *