..आणि मायलेकी थोडक्यात बचावल्या

धावती लोकल पकडणे हे जीवावर बेतू शकते, त्यामुळे असे साहस करु नका हे आवाहन रेल्वेकडून करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कुर्ला स्थानकातील हार्बरच्या प्लॅटफॉर्म क्रमांत सातवर संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी पनवेल लोकल आली. ही लोकल सुटत असतानाच एक महिला तीच्या मुलीसह लोकल पकडण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र मुलीच्या आईला लोकल पकडता येणे शक्य नव्हते. तरीही लोकल पकडण्याचा प्रयत्न महिला करु लागल्याने यात प्रथम मुलीचा तोल गेला आणि ती लोकल व प्लॅटफॉर्मच्या जागेमध्ये अडकली. नंतर महिला प्लॅटफॉर्म पडल्यानंतर हळूहळू सरकत गेली. हा प्रसंग पाहून काही प्रवाशांनी आरडाओरड केली. त्याचवेळी उपस्थित आरपीएफ कॉन्स्टेबल प्रमोद गीतेंनी प्रसंगावधान दाखवून मुलीला बाहेर काढले. तर तिच्या आईचा जीवही कॉन्सेटबल विकास पाटील यांनी वाचविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *