शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल हॉटेलला भीषण आग लागली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत हॉटेलचे 4 मजले जळून खाक झाले आहेत. तब्ब्ल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असलं तरी आतमध्ये मात्र आग अजून धुसमत आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
