व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या त्यानंतर राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळालेल्या ‘माणुसकीची भिंत’ या संकल्पनेला आता नवी उभारी मिळाली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनीही आता लोअर परळ येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारली असून या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आधार देण्याचा मानस आहे.
थंडीच्या दिवसांत रस्त्यांवर झोपणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपक्रम राबविल्याचे डबेवाल्यांनी सांगितले. डबेवाले संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संकल्पनेला यश मिळाले तर मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर डबेवाल्यांची ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना राबवण्यात येईल असे करवंदे यांनी सांगितले.
या संकल्पनेत थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे ब्लॅन्केट, रजई, शाल, लोकरीचे कपडे, मफलर, स्वेटर या वस्तूंना स्वच्छ धुवून त्यांना इस्त्री करून त्यांची व्यवस्थीत घडी घालून त्या ‘माणुसकीच्या भिंत’ येथे जमा कराव्यात.
