मालाडमधील दारूबळींचा आकडा ६६वर

मालाडमधील दारूबळींचा आकडा ६६वर

मालवणीत हातभट्टीची विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आतापर्यंत ६६वर पोहोचली आहे; तर शहरातील विविध हॉस्प‌िटलांमध्ये २९ जणांवर उपचार सुरू आहेत. तब्येत खालावल्यामुळे अनेकांना शुक्रवारी खासगी रुग्णालयांतून पालिका रुग्णालयांत दाखल करण्यात येत होते. दरम्यान, घटनेची जबाबदारीनिश्चिती करीत पोलीस आयुक्तांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या सीनिअर इन्स्पेक्टरसह आठ जणांचे निलंबन केले आहे.

 मालाडच्या मालवणी भागातील खारोटी गावाजवळच्या लक्ष्मीनगर वस्तीमध्ये बुधवारी रात्री आण‌ि गुरुवारी सकाळी हातभट्टीची दारू प्यायल्याने अनेकांची तब्येत ब‌िघडली. सुरुवातीला कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर पेशंटचा ओघ वाढतच राहिला. त्यानंतर गोरेगावचे सिद्धार्थ हॉस्प‌िटल, परळचे केईएम, मुंबई सेंट्रलचे नायर हॉस्प‌िटल यांमध्ये पेशंटांना आणण्यात आले. आतापर्यंत या दारूमुळे ६६ जणांनी आपला जीव गमावला आहे, तर २९ जणांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *