न्यूझीलंडमध्ये काम करणाऱ्या एका शीख नागरिकाला पगडी घातली म्हणून क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे या शीख माणसाने धार्मिक भेदभाव केल्याची तक्रार दाखल केली आहे.
गुरप्रीतसिंग असे या शीख नागरिकाचे नाव असून ते इस्टेट एजंट म्हणून काम करतात. आॅकलंड येथील कास्मोपोलिटीन क्लबमध्ये सहकाऱ्यांसोबत दुपारच्या जेवणासाठी गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेमुळे मला धक्का बसला असून अपमान झाल्याची भावना आहे, असे गुरप्रीतसिंग यांनी म्हटले आहे.
