शरद पवारांची चौकशी नाही : फडणवीस

शरद पवारांची चौकशी नाही : फडणवीस

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात राज्यात कोणतीही चौकशी सुरू नाही. त्यांना चौकशीला बोलविण्याचा सध्यातरी प्रश्न नाही. त्याचबरोबर माजीमंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे. सरकार अकास बुद्धीने कसलीही कारवाई करत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यासाठी ते गुरुवारी जिल्ह्यात आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करतानाच, ‘मी आणि माझे सहकारी यांना हे सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकणार याची वाट बघत आहोत,’ असे विधान केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांची राज्यात कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे स्पष्ट केले. भुजबळ यांच्यावरील कारवाई ही नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कायद्याने काम करीत असून, अँटी करप्शन ब्युरो पुराव्यांच्या आधारे काम करत आहेत. सरकार अकस बुद्धीने कसलीही कारवाई करत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *