श्वास अवरुद्ध होऊन उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीवर उपचार शोधून काढणारे अमेरिकेचे ज्येष्ठ डॉक्टर हेन्री हेमील्च यांचे शनिवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
सोमवारी डॉ. हेमील्च यांना ह्रदयघाताचा झटका आल्यानंतर त्यांना उपचरार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांनी श्वास अवरुद्ध होऊन उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीवर जीवनदायी उपचार शोधून काढला होता. याअंतर्गत विशिष्टपद्धतीने ते ओटीपोटावर धक्के देऊन रुग्णाचा श्वसनमार्ग मोकळा करत असत.

