प्रणव धनावडेला पोलिसांनी मारले

विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे व त्याच्या वडिलांना पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती समजताच शिवसैनिकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांना त्यांनी दमात घेत जाब विचारला.

जानेवारी २०१६ मध्ये प्रणव धनावडे याने एक हजार नऊ धावा काढून जागतिक विक्रम केला. त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. शनिवारी सायंकाळी धनावडे व अन्य क्रिकेटपटू सुभाष मैदानात सराव करीत होते. त्या वेळी तेथे आलेल्या एका पोलिसाने त्यांना शिव्या देत पिटाळण्याचा प्रयत्न केला.

धनावडे यांनी जातो, असे सांगितले तरी तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्या वेळी त्याने त्याचे वडील प्रशांत धनावडे यांना बोलावून घेतले. ते दाखल होताच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर, दोघांवर हात उगारला. जीपमधून बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करण्याची भाषा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *