मनमानी कारभार करण्यासाठी ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन महिला वाहतूक पोलिसांवर फिदा झाला आहे. त्याने वाहतूक पोलिसांसाठी खास नवे धोरण आणले आहे. या धोरणातंर्गत किम जोंग वाहतूक पोलिस शाखेत फक्त महिलांची भरती करतो.
वाहतूक पोलिसाची नोकरी मिळवण्यासाठी किमच्या दोनच अटी आहेत सौदर्य आणि हॉटनेस. किम जोंग स्वत: मुलाखती घेऊन वाहतूक महिला पोलिसांची निवड करतो. उत्तरकोरियाच्या वाहतूक महिला पोलिसांसाठी खास वेबसाईट असून त्यावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत.
उंच आणि सुंदर महिलांना उत्तर कोरियामध्ये वाहतूक पोलिसाची नोकरी सहजतेने मिळते. तीन वर्षांपूर्वी एका महिला वाहतूक पोलिसाने किम जोंगला हत्येच्या कटातून वाचवले तेव्हापासून तो वाहतूक पोलिसांकडे जास्त आकर्षित झाला असे बोलले जाते.