14 नगरपालिकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात

पुणे आणि  लातूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून  निकाल हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी 73.12 टक्के मतदान झाले. तर लातूरमध्ये 4 नगरपालिकांसाठी 70.45 टक्के मतदान झाले.

पुणे : लोणावळा नगरपालिका,  शिवसेना 3, भाजप 2, अपक्ष 2 जागांवर विजयी
पुणे : सासवड नगरपालिका,  जनमत विकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी
पुणे : जुन्नर नगरपालिकेत राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी, एकूण जागा 16
पुणे : तळेगाव दाभाडेत जनसेवा विकास आघाडी 7 (3 बिनविरोध), शहर सुधारणा विकास आघाडी 0, एकूण जागा 26
पुणे :  आळंदी नगरपालिकेत शिवसेना 4, भाजपा 4 जागांवर विजयी
पुणे : शिरुर नगरपालिकेत शहर विकास आघाडी 20 पैकी 7 जागांवर विजयी, 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध
पुणे :  तळेगाव दाभाडेमध्ये जनविकास आघाडीला 26 पैकी 5 जागा
लातूर : नगरपालिका निवडणुकांत एमआयएमने उघडले खाते, उदगीरच्या पाच जागांचा निकाल जाहीर, एमआयएम 3, काँग्रेस 1, भाजपाला 1 जागा
लातूर :  औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा, औसा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख विजयी
लातूर :   निलंगा नगरपरिषदेतील दोन प्रभागातील 4 जागांचा निकाल जाहीर, भाजपा 3 आणि काँग्रेसला 1 जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *