मी माझी गाणी फार ऐकत नाही – लता मंगेशकर

आपल्या सूरेल आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवणा-या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी यावर्षी सिनेसृष्टीत 75 वर्ष पूर्ण केली. 1942 सालापासून चित्रपटात गायनाची सुरुवात करणा-या लता मंगेशकर यांना 1949 साली आलेल्या महल चित्रपटाने स्टार गायिकेचा दर्जा मिळवून दिला. ‘आयेगा आने वाला’ हे त्यांचे गाणे तुफान लोकप्रिय ठरले.
ऑल इंडिया रेडिओवर जेव्हा पहिल्यांदा हे गाणे वाजवण्यात आले. त्यावेळी रेडिओ स्टेशन दूरध्वनी क्रमांकावर फोन कॉल्सचा पाऊस पडला होता. प्रत्येकाचा गायिकेचे नाव काय ? हा एकच प्रश्न होता. तेव्हापासून आजपर्यंत लता मंगेशकर नावाची जादू कायम आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या या 75 वर्षांच्या प्रवासाबद्दल त्यांची मुलाखत घेतली.
त्यावेळी त्यांना तुमचे सर्वात आवडते गाणे कोणते ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लता मंगेशकरांनी चित्रपटात मी गायलेली अनेक गाणी मला आवडतात पण मी माझीच गाणी फार ऐकत नाही. ह्दयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेली चला वाही देस आणि मीरा यांची भजने मला फार आवडतात. संत मीरा यांनी ज्या पद्धतीने त्या भजनांची रचना केली आहे. ती त्या काळात घेऊन जातात असे लता मंगेशकरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *