दिल्लीत हॉटेलमधून 3.25 कोटींची रोकड जप्त

करोलबाग परिसरातील हॉटेलमधून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. माहिती मिळाल्यानंतर आयकर विभाग आणि दिल्ली क्राईम ब्रांचने संयुक्त कारवाई करत टाकलेल्या धाडीत 3 कोटी 25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा आहेत.

संशयितांनी नोटांचं पॅकेजिंग अशा पद्धतीने केलं होतं की विमानतळावर स्कॅनिंग मशिनमध्ये नोटा असल्याचं दिसलंच नसतं. हे संशयित पॅकेजिंग एक्स्पर्ट असल्याची माहिती मिळाली आहे. हे पॅकेजिंग एक्स्पर्ट टेप्स आणि तारांचा वापर करत होते ज्यामुळे जुन्या नोटा स्कॅनिंग मशिनमध्ये दिसल्याच नसत्या. पोलीस या संशयितांचे मोबाईलदेखील तपासत असून यामधून अनेक हवाला ऑपरेटर्सची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *