‘क्राईम पेट्रोल’फेम कमलेश पांडेची आत्महत्या

‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमात अनेकदा पोलिसांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता  कमलेश पांडे यानं आज आत्महत्या  केल्याचं समोर आलंय.

मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये ही घटना उघडकीस आलीय. मंगळवारी, त्यानं स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याचं समजतंय. पण, कमलेशच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय? हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही.

कमलेशच्या पत्नीची बहिण अंजनी चतुर्वेदी या गर्भवती आहेत. काही दिवसांपूर्वीच अंजनी यांच्या मोठ्या मुलीचा विवाह पार पडला. या विवाहासाठी आपल्याला बोलावण्यात आलं नव्हतं याचा राग कमलेशच्या मनात होता.

त्यामुळे, मंगळवारी संजिवनी नगर भागात भरपूर दारू पिल्यानंतर कमलेशचा तोल ढासळला होता. त्यानं बंदूक बाहेर काढून प्रथम हवेत गोळीबार केला आणि त्यानं दुसरी गोळी स्वत:च्या छातीत झाडली. यामुळे, धक्का बसलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं.

कमलेश आणि त्याच्या पत्नीला दोन मुली आहेत. कमलेशच्या पोस्टमॉर्टेमनंतर गोष्टी आणखी स्पष्ट होण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *