कर्णधार धोनीला दंड

कर्णधार धोनीला दंड

मिरपूर वन डेत बांगलादेशच्या मुस्ताफिजुर रहमानला धक्का मारल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. धोनीला आयसीसीच्या लेव्हल टूच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं असून त्याला मानधनाच्या 75 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

मिरपूर वन डे सामन्यात भारतीय डावाच्या 25व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. पण त्यावेळी बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान हा धोनीसमोर आला. त्यावेळी धोनीने मुस्ताफिजुरला कोपराने जोरदार धक्का दिला.

धोनीनं दिलेला हा धक्का इतका जबर होता की, मुस्ताफिजुरला मैदानातून थेट बाहेर जावं लागलं. धोनीने मुस्ताफिजुरशी टक्कर टाळण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं.

रोहित शर्मा फलंदाजी करत असतानाही मुस्ताफिजुर अशाच प्रकारे मध्ये आला होता. त्यामुळे मुस्ताफिजुर रहमानलाही मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमूल हसन पापन यांनी धोनीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. धोनीकडून अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नसल्याचं मत नझमूल हसन पापन यांनी व्यक्त केलं आहे.

बांगलादेशविरोधातील एकमेव टेस्टमध्ये 150 धावा ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयला दंड ठोठावण्यात आला होता. आयसीसीच्या लोगोच्या नियमांचं उल्लंघन केल्याने मानधनाच्या 25 टक्के दंड बजावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *