मुसळधार पावसानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांना एका नव्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानासमोर शॉर्ट सर्किट झालं आहे. पालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम सुरु आहे.
जमिनीखालून जाणाऱ्या एका केबलला शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी वेळीच अमिताभ यांच्या घरी धाव घेतली आहे. दुरुस्तीचं काम सुरु असून लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल.
शुक्रवारी झालेल्या पावसानंतर बिग बी यांनी अविरत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं ट्विटरवरुन कौतुक केलं होतं.

