मुसळधार पावसामुळे शुक्रवारचा दिवस मुंबईकरांसाठी मनस्तापाचा ठरला. मात्र येत्या 24 तासात यापेक्षाही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शनिवार दिवसभर पावसाची संततधार कायम राहू शकते.
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. याशिवाय नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.
त्यामुळे पावसाची संततधार कायम राहिली तर आजही मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे.

