सचिनकडून ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेतला जाणार?

सचिनकडून ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेतला जाणार?

भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका याचिकेमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सचिनविरोधात मध्यप्रदेश हायकोर्टात एक याचिका करण्यात आली आहे, हायकोर्टाने ती याचिका मंजूरही करुन घेतली आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्काराचा वापर जाहिरातींसाठी करत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. भोपाळचे रहिवाशी असलेल्या व्ही. के. नस्वा यांनी ही याचिका केली आहे.

यापूर्वी भारतरत्न पुरस्कारासंबंधी एखाद्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे का, याबाबतची माहिती एका आठवड्यामध्ये सादर करण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश अजय माणिकराल खानविलकर आणि न्यायाधीश के. के. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

सचिन तेंडुलकर महान खेळाडू आहे. मात्र सचिन व्यवसायिक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये भारतरत्न पुरस्काराचा वापर करुन पैसे कमवत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.

सचिन तेंडुलकरने नैतिक जबाबदारी म्हणून भारतरत्न पुरस्कार परत केला पाहिजे, अशी मागणी या याचिकेत केली आहे. मात्र, जर सचिन स्वत:हून भारतरत्न परत करत नसेल, तर केंद्र सरकारने सचिनकडून पुरस्कार काढून घेतला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *