ECMO तंत्राने बंद पडलेली ह्दयक्रिया झाली सुरु, तरुणाला मिळाले जीवदान

सध्या ह्दयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुणवयातच ह्दयविकाराच्या झटक्याने होणा-या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत ईसीएमओ उपचारपद्धती जीवनदान देणारी ठरु शकते. मागच्या आठवडयात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निमित्ताने ईसीएमओ शब्दा अनेकांच्या वाचनात आला असेल.
जयललिता यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची ह्दयक्रिया पुन्हा सुरु करण्यासाठी डॉक्टरांनी ईसीएमओ तंत्राने प्रयत्नांची शर्थ केली. ईसीएमओ तंत्राने जयललिता यांचे प्राण वाचवता आले नसले तरी, एका 43 वर्षाच्या तंत्रज्ञाला ईसीएमओमुळे जीवदान मिळाले आहे.  43 वर्षीय श्रीनाथला ताप आल्याचे फक्त निमित्त झाले आणि अचानक श्रीनाथची ह्दयक्रिया बंद पडली.
श्रीनाथचा ह्दयविकार कुटुंबासाठी एक धक्का होता. कारण श्रीनाथ तंदुरुस्त होता तसेच ह्दयविकाराचा रुग्णही नव्हता. श्रीनाथवर उपचार करणा-या डॉक्टरांनी ईसीएमओ तंत्राचा वापर केला. ईसीएमओ मशीनने उपचार करताना रुग्णाच्या ह्दयातून रक्त आणि कार्बनडाय ऑक्साईड काढून ह्दयातील लाल पेशींमध्ये फ्रेश ऑक्सिजन सोडला जातो.
अपोलो रुग्णालयात जयललिता यांची बंद पडलेली ह्दयक्रिया सुरु करण्यासाठी अशाच पद्दतीने उपचार करण्यात आले. ईसीएमओने पहिल्या दिवशी श्रीनाथची ह्दयक्रिया 10 टक्के त्यानंतर  पाच दिवसांनी 25 टक्के ह्दयक्रिया पूर्ववत झाली. 10 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केल्यानंतर श्रीनाथची हदयक्रिया 35 टक्क्यापर्यंत पूर्ववत झाली होती. कुठल्याही सामान्य माणसापेक्षा हे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी होते.
श्रीनाथला कठोर डाएट पाळावे लागते आता त्याची ह्दयक्रिया पूर्णपणे सामान्य आहे. ईसीएमओचे यशापयश ह्दयाच्या स्थितीवर अवलंबून आहे. तात्पुरती ह्दयविकाराची समस्या असेल तर ईसीएमओचे उपचार यशस्वी ठरतात. निमोनियामुळे फुप्फुसांमध्ये संसर्ग झाला असेल तर ईसीएमओने  फुप्फुसांचे कार्य सुरळीत करता येते. ईसीएमओ फुप्फुस आणि ह्दयक्रिया सुरु करण्यासाठी उपयोग केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *