कांदिवलीत वृद्धाची निर्घृण हत्या

मुंबईत रविवारी रात्री आठच्या सुमारास एका वृद्धाची हत्या झालीय. कांदिवली  पश्चिमेला असणाऱ्या मथुरादास रोडवरच्या प्रितीम इमारतीत हा खून झालाय.

देवेंद्र दोषी असं मृत वृद्धाचं नाव असून त्यांच्या स्वतःच्या घरात चाकूनं वार करून ही हत्या करण्यात आली.

कौटुंबिक कलहामुळे दोषींची दोन मुलं आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहात असंत. पोलिसांनी इमारतीतलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *