अत्याचारानंतर विद्यार्थीनी गर्भवती, जीवे मारण्याचीही धमकी

नेरुळच्या एमजीएम शाळेत गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या शिक्षकानेच अत्याचार  केल्याची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी गर्भवती  राहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

पालकांनी याबाबत या शिक्षकाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हरिशंकर शुक्ला असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर याची वाच्यता केल्यास त्यानं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

सप्टेंबर महिन्यात पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेनं आरोपी शिक्षकाला पाठिशी घातल्याचा आरोप पालकांनी केलाय.

हा शिक्षक कायम शाळेतल्या विद्यार्थिनींना छेडत होता. याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई केली नसल्याचाही त्यांचा आरोप आहे.

याप्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित विद्यार्थिनी आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *