दुपारपर्यंत चेन्नईमध्ये धडकणार ‘वरदा’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात तयार झालेले वरदा चक्रीवादळ आज दुपारपर्यंत तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे.  चक्रीवादळ धडकण्यापूर्वी तामिळनाडूमध्ये जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या वरदा चेन्नईपासून 140 किमी अंतरावर आहे. वादळ धडकल्यानंतर वा-याचा वेग ताशी 100 ते 120 असू शकतो.
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. कांचीपूरम, तिरुवल्लूर येथील शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आली असून, मच्छीमारांना 30 नोव्हेंबरपासूनच समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. दक्षिण थायलंडमध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून, हे वादळ आता वेगाने तामिळनाडूच्या दिशेने सरकत आहे.
या वादळामुळेच अचानक अंदमान, निकोबार बेटावरील वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे तिथे अडकून पडलेल्या हजारो पर्यटकांची भारतीय नौदलाने सुटका केली. मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत चेन्नईमध्ये 7.5 मीमी पावसाची नोंद झाली. चेन्नईमध्ये अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले असून तापमानाचा पाराही घसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *