तुर्कस्तानची राजधानी इस्तांबूलमध्ये झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 29 जण ठार तर 166 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तुर्कीमधील दोन प्रसिद्ध फुटबॉल संघांदरम्यान झालेल्या सामन्यानंतर तासाभराने हे बॉम्बस्फोट झाले. त्यापैकी एक स्फोट फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या बसला लक्ष्य करून करण्यात आला. तर दुसरा स्फोट येथून जवळच असलेल्या एका पार्कमध्ये करण्यात आला. त्यापैकी दुसरा स्फोट हा एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेत घडवून आणला. त्यानंतर परिसरात गोळीबाराचा आवाजही ऐकू आला.
दरम्यान, या बॉम्बस्फोटांप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तुर्कीच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. मात्र या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
