प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाल्याची माहिती पाकिस्तानने सोमवारी दिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भिंबर क्षेत्रात भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली.
भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. आमच्या भूमीच्या रक्षणासाठी आम्ही पूर्ण सक्षम असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली.
भारतीय सैन्यामुळे सीमेवर तणाव वाढत असल्याचा कांगावाही त्यांनी केला. काश्मीरमधील मानवी हक्काचे उल्लंघन रोखण्यासाठीच भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याची पळपुटी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली.
