२३ टक्के जनधन खात्यांत नाहीत पैसे

नोटाबंदीनंतर जनधन खात्यांत जमा रकमेत वाढ झाली आहे. पण, अशी २३ टक्के जनधन खाती आहेत ज्या खात्यांत एक पैसाही नाही. ७ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात २५.८ कोटी जनधन खात्यांत २८८ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या खात्यांत एकूण ७४,६०९ कोटी जमा आहेत.

नोटाबंदीनंतर एका महिन्याने जनधन खात्यांत जमा रकमेत २९ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पण, शून्य रक्कम असलेल्या खात्यांची संख्या २२.९ टक्क्यांवर कायम आहे. नोटाबंदीनंतरच्या सुरुवातीच्या काळात जनधन खात्यांत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली. पण, काही आठवड्यांनंतर यातही घट दिसून आली. ३० नोव्हेंबरपर्यंत जनधन खात्यांत १४८७ कोटी रुपये जमा झाले तर, गत आठवड्यात या खात्यांत ८२८३ कोटी रुपये जमा झाले. नोटाबंदीनंतरच्या पहिल्या आठवड्यात जनधन खात्यांत १८,६१५ कोटी रुपये जमा झाले. १७ ते २३ नोव्हेंबर या काळात या खात्यांत ८,५८२ कोटी रुपये जमा झाले. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २५.८ कोटी जनधन खात्यांत एकूण जमा रक्कम ७४,६०९ कोटी रुपये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *