-
दादरमधील शिवाजी पार्क परिसरात एका डॉक्टरने पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर हत्येनंतर आरोपीने स्वत: पोलीस कंट्रोल रूमला फोन करून गुन्ह्याची माहिती दिली.शिवाजी पार्क येथील कोहिनूर टॉवर्समध्ये राहणारा आरोपी डॉ.उमेश बोबले (वय ४०) डेंटिस्ट असून त्याची मृत पत्नी डॉ. तनुजा ही देखील डॉक्टरच होती. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांदरम्यान कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही केला होता असे समजते. रविवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाले व त्याचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. अखेर रागाच्या भरात डॉक्टर उमेशने तनुजावर चाकून हल्ला केला, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डॉ. उमेशने स्वत: पोलिसांना फोन करुन गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तनुजाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी उमेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या पोलीस कोठीडत आहे.
