‘नीट’ आता मराठीतून!

२०१७ पासून वैद्यकीय अभ्यासक्र म प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात, ‘नीट’ आता इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही देता येईल. इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलुगू या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

‘नीट’ची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केल्यास पेपर फुटण्याची भाती होती. इंग्रजी वगळता इतर भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध नसल्याने हा पर्याय चूक असल्याचेही अनेकांचे म्हणणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *