वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला नाकारले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज

प्रकल्पासाठी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले अपयश तसेच गॅस वितरण कंपनीचा निरुत्साह यामुळे वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला नैसर्गिक गॅस प्रकल्पासाठी मंजूर केलेले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द केले आहे. सुई साउर्थन गॅस कंपनीकडे हा प्रकल्प होता.
कराची, सिंध आणि बलुचिस्तान भागात ही कंपनी नैसर्गिक गॅसचा पुरवठा करते. एसएसजीसी कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रकल्पामध्ये दाखवलेला निरुत्साह हे देखील कर्ज नाकारण्यामागे एक कारण आहे. वर्ल्ड बँकेने 20 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याचा शब्द दिला होता.
गॅस वितरणातील अनियमततेमुळे पाकिस्तानातील तेल आणि नैसर्गिक वायूचे नियमन करणा-या यंत्रणेने गॅस कंपन्यांना दंडही ठोठावला होता. वर्ल्ड बँकेने पूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यात प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक आव्हाने आहेत तसेच ठरवलेल्या उद्दिष्टांमध्ये समाधानकारक प्रगती नसल्याचे बँकेच्या नजरेस आले त्यामुळे कर्ज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *