आता बँक कर्मचारीही आंदोलनाच्या पवित्र्यात

  • गेले महिनाभर संपूर्ण देशातील विविध बँकांतील कर्मचारी चलन तुटवड्यामुळे मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारने ५० दिवस कळ सोसायला सांगितले असले तरी ही कळ कर्मचाऱ्यांना असह्य झाली असून शनिवारपासून (दि. १०) आंदोलनाची सुरुवात करणार आहे. पहिल्या टप्प्यात निवेदन देऊन सरकारला इशारा देणार असून शेवटच्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेच्या दारात जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज युनियनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.रिझर्व्ह बँकेने रोज चलन उपलब्धीबाबतची माहिती जाहीर करावी, बँक व्यवस्थापनाने उपलब्ध चलनाचे वर्गीकरण सूचना फलकावर लावावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांवर ताण राहणार नाही.

    यासह चलन पुरवठा सुरळीत करा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय बँक एम्प्लॉईज असोसिएशन व अखिल भारतीय बँक अधिकारी असोसिएशनच्यावतीने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिले आहे, असेही तुळजापूरकर यांनी सांगितले.

    पेट्रोल पंपचालकांंवर विश्वास कसा?

    जिल्हा बँकेला ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली जाते आणि दुसरीकडे पेट्रोल पंप, मेडिकल, मॉलवर परवानगी दिली जाते. सामान्य माणसाचे आर्थिक केंद्र असलेल्या बँकेवर सरकारचा विश्वास नसणे हे दुर्दैव असून यामुळे सहकार संपेल.

    – देवीदास तुळजापूरकर,

    महासचिव-महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज युनियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *