रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस सुरु, महत्त्वाची शहरे जोडली जाणार; कुठे-कुठे थांबा?

 मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियमित स्वरूपात असणार आहे. सुमारे ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे, पनवेलपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणातील महत्त्वाची शहरे थेट रेल्वेने जोडली जाणार आहेत.

गाडी दररोज धावणार

प्रस्तावित सेवेला १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी १५०८८ सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस असे क्रमांक देण्यात आले आहेत. ही गाडी दररोज धावणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आणखी एक नियमित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वालिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *