उद्यापासून तीन दिवस बँका बंद

बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.

सध्या नोटांच्या तुटवड्यामुळे रोजच बँक तसेच एटीएमबाहेर लोकांची गर्दी असते. त्यातच पुढील तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यांमुळे ज्यांना बँकेची महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यांनी ती आजच करुन घ्यावीत.

उद्या आठवड्याती दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत. तसेच रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ईद-ए-मिलाद असल्याने बँक सोमवारीही बंद असेल. त्याचा परिणाम मंगळवारी बँकेच्या कामकाजावर नक्कीच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *