सेक्सला नकार दिला म्हणून पतीने जननेंद्रियच कापलं

पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने रागाच्या भरात स्वताचे जननेंद्रियच कापून टाकल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे.
घासीराम असं या व्यक्तीचं नाव असून गेल्या आठवड्यातील ही घटना आहे. घासीराम दारुच्या नशेत घरी आले असता पत्नीकडे सेक्स करण्याची मागणी केली. मात्र पत्नीने नकार दिल्यानंतर घासीराम यांचा पारा चढला आणि रागाच्या भरात स्वताचं जननेंद्रियच कापून टाकलं.
माझी पत्नी मांझरी देवी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याशी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार देत आहे’, असा दावा घासीरामने केला आहे. ‘मला राग आला होता, चिडचिड झाली होती. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून आम्ही सेक्स केलेला नाही. ती कधीच करु देत नाही’, असं घासीरामचं म्हणणं आहे. मात्र मांझरी देवी यांनी आपल्या पतीचे आरोप फेटाळले आहेत. घासीराम आणि मांझरी देवी यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांनी तीन मुले आहेत.
‘ते दारुच्या नशेत होते म्हणूनच मी नकार दिला. मला त्यांचा खूप राग आला होता. मी काहीच केलं नसूनही माझ्यावरच सर्व आरोप केले जात आहेत’, अशी बाजू मांझरी देवी यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *