दहशतवादी ओसामा बिन लादेनची बाहुली विक्रीला

अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेलेला अल्‌ कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याची बाहुली विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

अमेरिकेच्या तपास यंत्रणेशी निगडित असलेल्या विभागाने लादेनच्या तीन बाहुल्या तयार केल्या आहेत. केवळ बारा इंचाच्या बाहुल्या असून, त्यांना ‘डेव्हिल आइज‘ असे नाव देण्यात आले आहे. लहान मुलांनी दहशतवाद्यांपासून लांब राहण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. प्रसिद्ध बाहुली निर्माते डोनाल्ड लेव्हिन यांनी बाहुली तयार केली आहे.

अमेरिकेच्या तपास यंत्रणेने या बाहुलीला मान्यता दिल्यानंतर तयार करण्यात आली आहे. पाकिस्तान व अफगणिस्तानमध्ये ती पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *