पाकिस्तानाचे प्रवासी विमान कोसळले,21 मृतदेह मिळाले

पाकिस्तान एयरलाइन्सच्या एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला आहे. एबोटाबादजवळ हॅवलीयन गावाजवळ हे प्रवासी विमान कोसळले. हवेतच विमानाने पेट घेतला व विमान कोसळले. पीके-661 विमानातून पाकिस्तानी गायक जुनेद जमशेद आणि तीन विदेशी नागरीकांसमवेत एकूण 47 प्रवासी विमानात होते. आतापर्यंत 21 मृतदेह मिळाले आहेत. या विमानात 31 पुरुष, 9 महिला आणि 2 नवजात मुले प्रवास करत होते. याशिवाय दोन एअरहोस्टेस आणि तीन पायलटसुध्दा होते.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती आहे. चित्रालहून हे विमान राजधानी इस्लामाबादला निघाले होते. दुपारी 3.30 वाजता या विमानाने चित्राल येथून उड्डाण केले. एबोटाबादजवळ हे विमान रडारवरुन गायब झाले. लष्कराच्या पथकांना आणि हॅलिकॉप्टर्सना दुर्घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *