चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत एका २० वर्षीय तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना चेंबूरच्या म्हाडा कॉलनी येथे घडली आहे. याबाबत आरसीएफ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

मोनिका (नाव बदलले आहे) असे या पीडित मुलीचे नाव असून ती चेंबूर वाशी नाका येथील म्हाडा कॉलनी वसाहतीत राहणारी आहे. सहा महिन्यांपूर्वी तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. काही दिवसांतच या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हीच संधी साधत आरोपीने या मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने सोमवारी आसीएफ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. मात्र ही बाब आरोपीला समजल्यानंतर त्याने पळ

काढला. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *