शी चिनफिंग यांनी प्यायली बिअर, चीनी कंपनीने विकत घेतला पब

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग गेल्यावर्षी ब्रिटन दौ-यावर गेले असताना ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्यासोबत एका पबमध्ये गेले होते. दोन्ही नेत्यांनी यावेळी मैत्रीपुर्ण गप्पा मारत बिअर प्यायली होती. दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे पबची एका रात्रीत प्रसिद्धी झाली, आणि ग्राहकांची गर्दी होऊ लागली. आता चीनी कंपनी सिनो फोर्टोनने या पबला 26 लाख डॉलर्समध्ये विकत घेतलं आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग गतवर्षी ऑक्टोबर 2015 मध्ये चार दिवसांच्या ब्रिटन दौ-यावर आले होते. यावेळी डेव्हिड कॅमेरॉन यांच्यासोबत यांनी शी चिनफिंग यांना ‘द प्लफ अॅट कॅडसेडन क्लब’मध्ये नेलं होतं. दोघांनीही यावेळी बिअर आणि जेवणाचा आनंद घेतला. दोघांनी खूपवेळ चर्चादेखील केली, डेव्हिड कॅमेरॉन यांनी काही किस्सेदेखील सांगितले. 2012 मध्ये आपल्या आठ वर्षाच्या मुलीला चुकून क्लबच्या मागे विसरल्याचा किस्साही डेव्हिड कॅमेरॉन यांनी यावेळी सांगितला.
‘द प्लफ अॅट कॅडसेडन क्लब’मधील डेव्हिड कॅमेरॉन आणि शी चिनफिंग यांचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पबला प्रसिद्धी मिळाली. चीनी पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. सिनोफोर्टोनने या पबची खरेदी केली आहे. 26 लाख डॉलर म्हणजे तब्बल 17.5 कोटीं रुपयांमध्ये या क्लबची खरेदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *