तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेते, संपादक, राजकीय विश्लेषक आणि जयललिता यांचे निकटवर्तीय चो रामास्वामी यांचेही बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांनीही अपोलो हॉस्पिटलमध्येच उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
पहाटे 4.15 वाजता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 2015 मध्ये आजारी असताना जयललिता यांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. राजकारणात त्यांची गरज असल्याचे म्हणत रामास्वामी यांना लवकर बरे होण्यासाठी सांगितले होते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेतली होती.