बीटेक स्टुडंट्सनी छापल्या २००० च्या ३ कोटींच्या बनावट नोटा

मोहालीमध्ये २००० च्या बनावट नोटा छापल्याचे आतापयर्ंतचे सर्वात मोठे प्रकरण समोर आले आहे. लष्करी कुटुंबाशी संबंध असलेला एक २१ वर्षीय बीटेकचा विद्यार्थी अभिनव वर्मा आणि त्याची २० वर्षांची बहीण विशाखा वर्मा यांना २००० च्या सुमारे तीन कोटी किमतीच्या नोटा छापल्याप्रकरणी अटक झाली आहे. नोटा स्कॅन करून त्यांनी छापल्या होत्या. या नोटा जुन्या नोटांच्या बदल्यात लोकांना दिल्या होत्या. असे २ कोटी रुपये त्यांनी बाजारात लोकांना वाटले असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्यांनी ३० टक्के कमिशनही घेतले.

कॉम्प्युटर, स्कॅनरसह इतर साहित्य जप्त

मोहाली पोलिसांनी अभिनव आणि त्याची बहीण विशाखाला मंगळवारी रात्रीच मोहालीमध्ये अटक केली. त्यावेळी लालदिवा असलेल्या एका ऑडी कारमधून ते ४२ लाखांच्या बनावट नोटा घेऊन जात होते. या पैशाचा वापर ब्लॅकमनी व्हाईट करण्यासाठी केला जाणार होता. लुधियानाचा दलाल सुमन नागपालही गाडीत होता. तोच या कामात मध्यस्थी करत होता. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी चंदिगड इंडस्ट्रीयल एरियामधील ऑफिसमध्ये २० लाखांच्या बनावट नोटांसह कॉम्प्युटर, स्कॅनर आणि इतर सामानही जप्त केले आहे. यात अजूनही दोघांचा समावेश आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

असे पकडले आरोपी..

काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लक्झरी गाडी आणि त्यावर लालदिवा पाहून पोलिसांना कोणीतरी मंत्री जात असेल असे वाटले. पण पायलट जिप्सी नसल्याचे पाहून पोलिसांनी गाडी अडवली तेव्हा गाडीतून ४२ लाखांच्या नोटा मिळाल्या. चंदिगडच्या इंडस्ट्रीयल एरिया फेज-१ मध्ये लाईव्ह वेरल सॉल्युशन नावाच्या एका कंपनीत त्यांचे ऑफिस असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यात ठिकाणी त्यांनी २००० च्या नव्या नोटा स्कॅनिंग करून तीन कोटींपेक्षा अधिकच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या.

आई लेफ्टनेंट कर्नल, वडील होते गव्हर्नमेंट ऑफिसर

२१ वर्षीय आरोपी अभिनवचे वडील हरियाणा सरकारमध्ये चांगल्या पदावर नोकरीला होते. गेल्यावर्षीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्याची आई लेफ्टनंट कर्नल आहे. त्याच्याबरोबर अटक झालेली त्याची बहीण विशाखा ही त्याच्या मामाची मुलगी असून तिचेही बीटेक झालेले आहे. २० वर्षीय विशाखा कपूरथलामध्ये राहते.

वरच्या दोन नोटा ख-या…

अभिनव आणि विशाखा ब्लॅकमनी व्हाईट करण्यासाठी ३० टक्के कमिशन घ्यायचे. म्हणजे एक कोटींच्या (५००-१०००) च्या नोटांच्या मोबदल्यात ते ७० लाखच द्यायचे. १ कोटींच्या ख-या नोटा घेऊन ते ७० लाखांच्या बनावट नोटा द्यायचे. २००० च्या बंडलमधील वरच्या दोनच नोटा ख-या इतर सर्व नोटा खोट्या असायच्या.

आता पैसे बदलून घेतलेल्यांचा शोध…

अभिनव आणि विशाखा यांना पोलिसांनी मोहालीला जाताना अटक केली. त्यांनी २ कोटींच्या बनावट नोटा मार्केटमध्ये पसरवल्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी लुधियाना येथील दलाल सुमन नागपाललाही अटक केली. तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून नोटा घेणा-यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *