साईबाबांच्या दानपेटीत साडे नऊ कोटी रुपये!

नोटाबंदी निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा शिर्डी येथिल साई मंदिर संस्थानाला झाला असून गेल्या २४ दिवसांत या मंदिराच्या दानपेटीत साडे नऊ कोटी रूपये जमा झाले आहेत. यामध्ये १००० रूपयाच्या १ कोटी २७ लाख नोटा असून ५०० च्याही तेवढ्याच नोटा आहेत.

दानपेटी उघडून गेले ३ दिवस या नोटांची मोजणी आणि बांधणी सुरू असून नोटांचे गठ्ठे भिंतीनजीक उभे केले असता त्याची उंची ६.५० फूट होती. तसेच रूंदीही तेवढीच होती. संस्थांनने हे सर्व पैसे शिर्डी बँकेत जमा केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *